Top News आंतरराष्ट्रीय ठळक बातमी ताज्या बातम्या

उत्तर कोरियाकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी आक्षेपार्ह टिप्पणी

सेऊल : कॅनडामध्ये भारत, अमेरिका समवेत 20 देशांचे प्रतिनिधी कोरिया संकटावर तोडगा काढण्यासाठी एकीकडे चर्चा करत आहेत. तर दुसरीकडे उत्तर कोरियाने पुन्हा एकदा शांततेच्या प्रयत्नांना झटका देण्याची कृती केली. उत्तर कोरियाने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विट संदेशावर आक्षेपार्ह टिप्पणी केली.
ट्रम्प यांचा ट्विट ‘पिसाळलेल्या श्वानाचे भुंकणे’ असल्याचे उत्तर कोरियाने म्हटले. ट्रम्प यांनी स्वतःच्या ट्विटमध्ये माझ्या टेबलवर किम यांच्यापेक्षा मोठी ‘आण्विक कळ’ असल्याचा दावा केला होता. दक्षिण कोरियात पुढील महिन्यात होणाऱया हिवाळी ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्याच्या उत्तर कोरियाच्या निर्णयानंतर तणाव कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, परंतु अशा प्रक्षोभक वक्तव्यांमुळे पुन्हा तणाव वाढू शकतो. उत्तर कोरियाच्या सामर्थ्याने ट्रम्प घाबरलेले आहेत. ट्रम्प यांच्या वर्तनातून पराभूत मानसिकता दिसून येते, असा दावा तेथील सरकारी वृत्तपत्राने केला आहे.