Top News ठळक बातमी ताज्या बातम्या राज्य राष्ट्रीय

ओवैसींकडून मुस्लीम बांधवांना ‘पद्मावत’ न पाहण्याचे आवाहन

हैदराबाद : पद्मावत सिनेमाच्या बाबतीत सध्या देशात वाद सुरु आहे. हैदराबादचे लोकसभा खासदार आणि एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी देखील या वादात उडी घेतली आहे. ओवैसींनी मुस्लीम लोकांना हा सिनेमा न पाहण्याचे आवाहन केले आहे.
सिनेमाला काहीही किंमत न देता ओवैसींनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ‘अल्लाहने लोकांना वेळ असे सिनेमे बघण्यासाठी नाही दिली आहे. तुम्ही लोकं सिनेमा पाहून तुमचा वेळ आणि पैसा वाया घालवू नका.’ आंध्र प्रदेशमध्ये एका सभेत बोलतांना त्यांनी ही वक्तव्य केले आहे. असदुद्दीन ओवैसींनी सिनेमाला काडी मात्र किंमत दिलेली नाही. ओवैसींनी म्हटले की, ‘सिनेमाच्या मागे धावू नका. अल्लाहने जीवन जगण्यासाठी आणि काही चांगले काम करण्यासाठी दिले आहे. पंतप्रधान मोदींनी या बकवास सिनेमाच्या रिव्ह्यूसाठी 12 लोकांचं पॅनल देखील बनवले आहे. पद्मावतची कथा 1540 मधील कवि मलिक मोहम्मद जायसी यांनी लिहिली होती. जी पूर्णपणे काल्पनिक होती. यानंतर देखील मोदी सरकार या सिनेमाबाबत सकारात्मक आहे.’ सर्वोच्च न्यायालयाने पद्मावत सिनेमा प्रदर्शित होण्याचा मार्ग गुरुवारीच मोकळा केला आहे. काही राज्यांनी या सिनेमावर लावलेली बंदी हटवण्याचे आदेश देत सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण भारतात हा सिनेमा प्रदर्शित करण्याची परवानगी दिली होती.

Archives