अहमदनगर उत्तर महाराष्ट्र कोंकण पश्चिम महाराष्ट्र पिंपरी-चिंचवड पुणे पुणे जिल्हा मराठवाडा महाराष्ट्र मुखपृष्ठ मुंबई राज्य राष्ट्रीय लाईफस्टाईल वर्धापन दिन विशेष विदर्भ व्हिडीओ

कझाकस्तानमध्ये प्रवासी बसला आग लागून 52 जण ठार

अस्ताना (कझाकस्तान) – कझाकस्तानमध्ये एका प्रवासी बसला लागलेल्या आगीत 52 प्रवासी जळून मरण पावल्याची माहिती देण्यात आली आहे. एईआयएसएम (एशियन नेशन्स इमरजन्सी सर्व्हिसेस मिनिस्ट्री) एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे. आज सकाळी 10.30 च्या दरम्यान 55 प्रवासी आणि दोन ड्रायव्हर असलेल्या या बसने अक्तोबा शहराच्या नजीक अचानक पेट घेतला. लागलेली आग इतक्‍या झपाटयाने पसरली, की बसमधील एकूण 57 जणांपैकी 2 ड्रायव्हर्ससह केवळ 5 जण बाहेर पडू शकले. बाकी 52 जण जागेवरच मरण पावले. जखमी 5 जणांवर उपचार चालू आहेत.

आग लागलेली बस इकारस या हंगेरियन मेकची होती. जुन्या सोव्हिएत संघराज्यातील काही राज्यांमध्ये आजही या जुनाट गाड्या वापरल्या जातात, अशी माहिती मंत्रालयाने दिली आहे. कझाकस्तान मध्ये नोंदणी केलेल्या या बसमधील प्रवासी उझ्बेकचे नागरिक होते, असे बसच्या ड्रायव्हरने सांगितले. बस व्होल्गा नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या समारा या रशियन शहरतून दक्षिण कझाकस्तानमधील शिम्केंट शहराकडे चालली होती.

कझाकस्तान आणि रशियन माध्यमांनी जारी केलेल्या एका व्हिडियोत बस जळताना दाखवली आहे. मात्र बसला लागलेल्या आगीचे कारण समजू शकले नाही. रशियन आणि कझाक माध्यमांनी जारी केलेल्या एका व्हिडियोत एका सरळ मार्गावर असलेली ही बस भडभडून जळताना दिसली होती.

About the author

newsworld_admin

Add Comment

Click here to post a comment