Top News अर्थ आंतरराष्ट्रीय क्रीडा ठळक बातमी ताज्या बातम्या

गॅलेक्‍सी रिअॅलिटी सर्कल क्रिकेट स्पर्धा आजपासून

णे – सर्कल ग्रुप आयोजित व गॅलेक्‍सी रिअॅलिटी प्रायोजित दहाव्या गॅलेक्‍सी रिअॅलिटी सर्कल प्रीमियर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धा शुक्रवार, दि. 19 ते रविवार, दि. 21 जानेवारी या कालावधीत कटारिया हायस्कूल मैदान, मुकुंदनगर येथे होणार आहे.

या स्पर्धेला गॅलेक्‍सी रिअॅलिटी यांनी प्रायोजित केले आहे. स्पर्धेत एकूण 8 निमंत्रित संघ सहभागी होणार असून स्पर्धेचे हे दहावे वर्ष आहे. स्पर्धेत सिआन वॉरियर्स, गौतम बॅनर्जी, जॉयबेल्स्‌, महाराष्ट्र पेपर्स, एमआरएल, निर्माण डेव्हलपर्स, श्री कृष्णा पर्ल्स आणि विंडसर शेल्टर्स हे 8 निमंत्रित संघ सहभागी होणार आहेत. साखळी व बाद फेरीत स्पर्धेचे सामने होणार आहेत. स्पर्धेचे सामने 10 षटकांचे होणार असून स्पर्धेत एकूण 15 सामने होणार आहेत.

स्पर्धेतील खेळाडू हे डॉक्‍टर, बिल्डर्स, व्यावसायिक व विविध क्षेत्रातील नामांकित पदाधिकारी असून सर्कल ग्रुपच्या वतीने सलग दहाव्या वर्षी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच, सर्कल ग्रुपतर्फे विविध सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघाला करंडक व आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू, सामनावीर, व मालिकावीर अशी विविध पारितोषिकेही देण्यात येणार आहेत.