Top News आंतरराष्ट्रीय ठळक बातमी ताज्या बातम्या

दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊनमध्ये शतकभरातला भीषण दुष्काळ

केपटाऊन : जगातले एक प्रमुख पर्यटन केंद्र म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहारात आता २२ एप्रिलपर्यंत पुरेल इतकाच पाणी साठा उरला सांगण्यात येत आहे.
गेल्या शतकभरातल्या सर्वात भीषण दुष्काळाने आता रौद्र रुप धारण केले आहे. येत्या २२ एप्रिलला शहरातल्या नळाला येणारे  पाणी बंद होणार आहे. त्यामुळे २२ एप्रिलला ‘डे झिरो’ असे नाव देण्यात आले आहे. पाण्याची कमतरता बघता शहर प्रशासनाने खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यात रुपांतर करणारी यंत्रणा पूर्ण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु केले आहेत.  तसेच भूगर्भातली पाण्याचा शोध घेण्यासाठी खोल विहिरी खोदण्याचे कामही युद्ध पातळीवर सुरू आहे. पण गेल्या तीन वर्षात पाऊसच पडलेला नसल्याने प्रशासनही हतबल आहे. दरवर्षी साधारण २० लाख पर्यटक केपटाऊनमध्ये येतात.

About the author

newsworld_admin

Add Comment

Click here to post a comment

Archives