Top News अग्रलेख अर्थ आंतरराष्ट्रीय ठळक बातमी मुखपृष्ठ राज्य राष्ट्रीय संपादकीय संपादकीय लेख

पाकिस्तानच्या गोळीबारात जम्मूतील दोन नागरिकाचा मृत्यू

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर पुन्हा पाकिस्तानकडून गोळीबार झाला. आज सकाळी 6.40 वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानने भारताच्या 30 ते 40 ठिकाणी गोळीबार केला. आरएसपुरा ते रामगढ सेक्टरपर्यंत पाकिस्तानकडून गोळीबार होत होता. यामध्ये दोन लोकांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे..
दोन दिवसांपूर्वीच पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान सुरेश शहीद झाले. शिवाय तीन नागरिकांचाही मृत्यू झाला. त्यानंतर भारताने प्रत्युत्तरादाखल कारवाई करत तीन पाकिस्तानी जवानांना ठार केले. पाकिस्तानकडून अत्याधुनिक शस्त्रांद्वारे गोळीबार करत होते. त्यावेळी भारतानेही पाकिस्तानच्या काही चौक्या आणि बंकर नेस्तनाबूत केल्या. पाकिस्तानाल ज्याप्रकारे भारताने प्रत्युत्तर दिले, त्यावरुन एक संदेश दिला गेला की, सीमेपलिकडून गोळी आल्यास, त्याचे उत्तरही गोळीनेच दिले जाईल.