अर्थ अहमदनगर आंतरराष्ट्रीय उत्तर महाराष्ट्र करिअरनामा कायदाविश्व कोंकण क्रीडा गंधर्व ठळक बातमी ताज्या बातम्या पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे जिल्हा प्रॉपर्टी फिचर फोटो गॅलरी मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुखपृष्ठ मुंबई यु सेल्फी युफोरिया राज्य राष्ट्रीय रूपगंध लाईफस्टाईल विदर्भ

मी हिंदूविरोधी नाही, मोदीविरोधी आहे – प्रकाश राज

हैदराबाद : मी हिंदूविरोधी नाही, मोदीविरोधी आहे असे दाक्षिणात्य सिनेमातील प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी म्हटले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर हिंदूविरोधी असल्याचे आरोप होत होते. त्या पार्श्वभूमीवर प्रकाश राज यांनी इंडिया टुडेच्या साऊथ कॉन्क्लेव्हमध्ये या आरोपांना उत्तर दिले. यावेळी प्रकाश राज यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांच्यावरही निशाणा साधला.

“मारेकऱ्यांचे समर्थन करणारा कुणीही व्यक्ती स्वत:ला हिंदू म्हणवून घेऊ शकत नाही. पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर मोदी समर्थकांनी सेलिब्रेशन केले. त्यावेळीही मोदींनी प्रतिक्रिया दिली नाही. एक खरा हिंदू कधीच अशा हत्यांचे समर्थन करणार नाही.”, असे प्रकाश राज म्हणाले.