Top News Uncategorized अग्रलेख अर्थ अर्थसार अस्मिता आरोग्य जागर करिअरनामा कायदाविश्व कोंकण क्रीडा गंधर्व पिंपरी-चिंचवड पुणे पुणे जिल्हा प्रॉपर्टी फोटो गॅलरी मनोरंजन मराठवाडा मुखपृष्ठ यु सेल्फी युफोरिया राष्ट्रीय रूपगंध लाईफस्टाईल व्हिडीओ संपादकीय संपादकीय लेख

विराट कोहली बनला दोन्ही संघाचा कर्णधार

मुंबई: आयसीसीने वार्षिक पुरस्कार जाहीर केल्यानंतर, आता वन डे आणि कसोटी टीमही जाहीर केली आहे. महत्त्वाचे  म्हणजे दोन्ही संघाचे नेतृत्त्व भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीकडे देण्यात आले आहे. विराट कोहली आयसीसीच्या वन डे आणि कसोटी संघ 2017 चा कर्णधार असणार आहे.
दोन्ही संघात भारताचे तीन तीन खेळाडू आहेत. वन डे संघात विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमरा यांचा समावेश आहे. तर कसोटी संघात विराट कोहलीसह चेतेश्वर पुजारा आणि रवीचंद्रन अश्विनने 11 जणांच्या संघात स्थान पटकावलं आहे. वन डे आणि कसोटी अशा दोन्ही संघात स्थान मिळवणाऱ्या खेळाडूंमध्ये डेव्हिड वॉर्नर, डी कॉक आणि बेन स्टोक यांचा समावेश आहे. विराट कोहलीने गेल्या वर्षभरात जबरदस्त फलंदाजी केली आहे. कोहलीच्या याच कामगिरीमुळे त्याची पहिल्यांदाच आयसीसीच्या कसोटी संघात वर्णी लागली. तर कोहली चौथ्यांदा आयसीसीच्या वन डे संघात निवडला गेला आहे. यापूर्वी तो 2012, 2014 आणि 2016 मध्ये आयसीसीच्या संघात होता.