Top News Uncategorized अर्थसार अस्मिता अहमदनगर उत्तर महाराष्ट्र कोंकण ठळक बातमी ताज्या बातम्या पश्चिम महाराष्ट्र पिंपरी-चिंचवड पुणे पुणे जिल्हा फिचर मराठवाडा महाराष्ट्र मुखपृष्ठ मुंबई राज्य विदर्भ व्हिडीओ संपादकीय

शनिवार वाड्यावर खासगी कार्यक्रमांना बंदी

पुणे : एल्गार परिषदेमुळे निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर शनिवारवाड्यावर खासगी कार्यक्रमांना बंदी घालण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे. केवळ महापालिका आणि शासकीय कार्यक्रमांनाच शनिवारवाड्यावर कार्यक्रम घेण्यास परवानगी असेल, असे पुणे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

पुणे महापालिकेने वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती देऊन शनिवारवाड्यावर खासगी कार्यक्रमांना बंदी घातली असल्याचे जाहीर केले आहे. सध्या अडीच हजार रुपयांमध्ये शनिवारवाडा कोणत्याही कार्यक्रमासाठी भाड्याने मिळतो. मात्र वाड्याबाहेर पार्किंगची सोय नसल्यामुळे होणारी वाहतूक कोंडी, कार्यक्रमांच्या वेळी होणारी अस्वच्छता, पर्यटकांची गैरसोय यामुळे हा निर्णय घेतल्याचे प्रशासनाच म्हणणं आहे.