Top News अर्थ अहमदनगर आंतरराष्ट्रीय उत्तर महाराष्ट्र कोंकण क्रीडा ठळक बातमी ताज्या बातम्या पश्चिम महाराष्ट्र पिंपरी-चिंचवड पुणे पुणे जिल्हा फिचर मराठवाडा महाराष्ट्र मुखपृष्ठ मुंबई राज्य राष्ट्रीय विदर्भ

हडपसर येथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल

पुणे – महाराष्ट्रातील आघाडीच्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्सपैकी एक असलेल्या सह्याद्री हॉस्पिटल्सने पुण्यातील हडपसर येथे नवीन हॉस्पिटल सुरू करून आरोग्य सेवा क्षेत्रात नवा मापदंड प्रस्थापित केला आहे. या नवीन सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमुळे रुग्णांना सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे. सह्याद्री हॉस्पिटल्स ही महाराष्ट्रातील आघाडीची हॉस्पिटल्सची शृंखला असून सध्या पुण्यातील डेक्कन जिमखाना, नगर रोड, कोथरूड, बिबवेवाडी, कसबा पेठ आणि हडपसर या भागांत, तसेच कराड आणि नाशिक या शहरांतही कार्यरत आहे.

या अत्याधुनिक हॉस्पिटलमध्ये हदयरोग चिकित्सा, अतिदक्षता (क्रिटिकल केअर मेडिसिन), आपत्कालीन चिकित्सा (इमर्जन्सी मेडिसिन), अंतस्राव विज्ञान (एंडोक्रिनॉलॉजी), कान, नाक, घसा, जठरांत्रमार्ग रोगचिकित्सा (गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी), सामान्य शस्त्रक्रिया (जनरल सर्जरी), प्रौढ रोगोपचार (इंटर्नल मेडिसिन), वैद्यकीय कर्करोग चिकित्सा (मेडिकल ऑन्कोलॉजी) आणि रक्तोपचार (हेमॅटॉलॉजी) या सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवांचा समावेश असणार आहे, असे प्रसिद्ध मेंदूरोगतज्ज्ञ आणि सह्याद्री हॉस्पिटल्सचे अध्यक्ष डॉ.चारुदत्त आपटे यांनी सांगितले. यावेळी सह्याद्री हॉस्पिटल्सच्या कार्यकारी संचालिका डॉ. जयश्री आपटे, सह्याद्री हॉस्पिटल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुर वर्मा आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

याव्यतिरिक्त, हे हॉस्पिटल दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, नवजात शिशु चिकित्सा (निओनॅटोलॉजी), मूत्रपिंड विकार चिकित्सा (नेफ्रॉलॉजी), मेंदूविकार चिकित्सा (न्यूरॉलॉजी), मेंदूशस्त्रक्रिया (न्यूरोसर्जरी), पोषण आणि आहार शास्त्र, प्रसुतिशास्त्र आणि स्त्रीरोग तज्ज्ञ, नेत्ररोगशास्त्र, अस्थीरोग चिकित्सा (ऑर्थोपेडिक्‍स), बालरोग शस्त्रक्रिया, बालरोगचिकित्सा, भौतिकोपचार (फिजिओथेरपी) आणि पुनर्वसन सेवा (रिहॅबिलिटेटिव्ह सर्व्हिसेस), फुप्फुसरोग चिकित्सा (पल्मोनोलॉजी), किरणोपचार कर्करोग चिकित्सा, या सेवाही देऊ करणार आहे. या नवीन अद्ययावत सुविधेद्वारे सर्व प्रकारच्या सुपर स्पेशालिटीज सेवा एकाच छताखाली उपलब्ध आहेत.

सह्याद्री हॉस्पिटल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुर वर्मा म्हणाले, रुग्णास घरासारखेच वातावरण वाटावे म्हणून प्रत्येक छोट्या गोष्टीवर विचार करण्यात आला आहे. डॉ.जयश्री आपटे म्हणाल्या, आधुनिक तंत्रज्ञान, तज्ज्ञ चिकित्सक आणि कुशल कर्मचारी वर्ग यांच्या साहाय्याने अधिक सुधारित वैद्यकीय परिणाम व रुग्णांची जलद रोगमुक्तता प्राप्त करण्यास यशस्वी ठरले आहोत.