अहमदनगर उत्तर महाराष्ट्र कायदाविश्व कोंकण गंधर्व पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे जिल्हा प्रॉपर्टी फोटो गॅलरी मनोरंजन महाराष्ट्र मुखपृष्ठ मुंबई यु सेल्फी युफोरिया राज्य राष्ट्रीय रूपगंध लाईफस्टाईल वर्धापन दिन विशेष संपादकीय

19 वर्षांखालील विश्‍वचषक : १० विकेट्स राखून भारताने झिम्बाब्वेला केले पराभूत

माऊंट मौनगनुई : अंडर १९ विश्‍वचषक स्पर्धेमध्ये भारतीय संघाने झिम्बाब्वेवर सहज विजय मिळवला आहे. भारताने झिम्बाब्वेला १० विकेट राखून पराभूत केले. झिम्बाब्वेने पहिल्यांदा फलंदाजी करताना ४८.१ षटकांत १५४ धावा केल्या. भारताने हे आव्हान सहज पूर्ण केले.

सलामीवीर एच एम देसाईच्या ५६ धावा आणि शुभम गिलच्या ९० धावांच्या जोरावर भारताने एकही विकेट न गमावता हे आव्हान पूर्ण केले. शुभमने ५९  चेंडूत १४ चौकार आणि एक षटकारासह ९० धावा ठोकल्या. तर देसाईने ७३ चेंडूत ५६ धावा केल्या. यात ८ चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. भारताने अवघ्या २१.४ षटकांत १५५ धावा केल्या. हा विजय मिळवून भारताने क्वार्टर फायनल मध्ये स्थान पटकावले आहे.